संकेत सुनिल भोसले याच्या मारेक-यांना फाशी द्या अशी मागणी - तथागत ग्रुप म.रा. संघटना आक्रमक
बुलढाणा :- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली मा.तहसीलदार साहेब मेहकर यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई, तसेच मा.गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांना निवेदन देण्यात आले की, दि. 14.02.2024 रोजी दुपारी 2:30 वा. सुमारास बी. एन.एन.कॉलेज समोर किरकोळ कारणावरून आरोपींनी वरळ देवी व एल. व्ही. आर हॉटेल जवळ संकेत सुनिल भोसले या युवकांस अमानुष व बेदम मारहाण करण्यात आली त्यास खाली पाडुन त्यांच्या छातीवर मानेवर बाईक चढविल्या तसेच त्याला उघडा करून बाईकवर बसविले व जीवे मारण्याच्या उददेशाने साठे नगरच्या दिशेने घेवून गेले. यावेळी एकुण 15-16 आरोपींनी मॉप बनवून त्यांची हत्या केली. आरोपी विरूध्द 302 चा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. यातील काही आरोपी अटक असुन बरेच आरोपी फरार आहेत. तरी फरार आरोपींना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी व संकेत सुनिल भोसले च्या मारेक-यांच्या मुसक्या आवळण्यात याव्यात. तसेच सदर प्रकरण फास्टट्रॅक्ट कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. तसेच एस. आय. टी. मार्फत चौकशी करण्यात यावी. अन्यथा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने महाराष्ट्रात जिल्हा, तालुका, गाव स्तरावर संपुर्ण महाराष्ट्रभर मोठे आंदोलन छेडण्यात येईल आसा इशारा देण्यात आला.
यावेळी,तथागत ग्रुपचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संदिप गवई,कुणाल माने,गौतम नरवाडे,राधेश्याम खरात,दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे,सचिन गवई, देवानंद अवसरमोल,संदिप राऊत,श्रीकृष्ण शेटाने,समस्त तथागत ग्रुपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

