तथागत ग्रुपच्यावतिने मेहकर येथे ग्रामिण रुग्णालय फळवाटप व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन..! - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Sunday, 10 March 2024

तथागत ग्रुपच्यावतिने मेहकर येथे ग्रामिण रुग्णालय फळवाटप व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन..!




 तथागत ग्रुपच्यावतिने मेहकर येथे ग्रामिण रुग्णालय फळवाटप व सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्य अभिवादन..!


बुलढाणा मेहकर : दिनांक 10/03/2024 रोजी रविवारला तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर येथे तथागत ग्रुप संपर्क कार्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. व तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांची कन्या चैत्रा संदिप गवई यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय अधिकारी साहेब डाँ.अनिल राठोड, ज्योती पारतुरकर, संतोषी टाले, डी.एम लहाणे, इंगोले साहेब, आडे साहेब यांच्या हस्ते शासकिय ग्रामिण रुग्णालय येथे फळ वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या पहिल्या महिला शिक्षिका असून त्यांनी अतिशय खडतर परिस्थितीतून महिलांना शिक्षणासाठी पहिली शाळा सुरू केली त्यांचे विचार सुरू केली त्यांचे विचार समजासाठी प्रेरणा देणारे आहे असे विचार तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप भाऊ गवई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विचार मांडले.


यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई, कुणाल माने, गौतम नरवाडे, अख्तर कुरेशी, राधेशाम खरात, दुर्गादास अंभोरे, महादेव मोरे, देवानंद अवसरमोल, सचिन गवई,सदिप राऊत, श्रीकृष्ण शेटाने आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.