जिल्हा संपर्क प्रमुख मा. राजपालभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा स्वाभिमान पार्टी शेगाव शहर प्रमुख मनोज पवार यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब शेगाव यांना निवेदन .
शेगांव - शेगाव प्रतिनिधी. दि. 07/03/2024
युवा स्वाभिमान पार्टी शेगाव शहर प्रमुख मनोज पवार यांच्या नेतृत्वात माननीय तहसीलदार साहेब शेगाव यांना निवेदन देण्यात आले की उत्पन्नाच्या दाखल्या साठी पाच पाच तलाठ्यांच्या सह्या घ्याव्या लागतात, त्या मुळे वेळ व आर्थिक भुर्दंड विद्यार्थी व तत्सम लोकांना गैरसोयीचे होते. तरी सदर अट रद्द करुन एकाच तलाठ्याचा दाखला ग्राह्य धरावा या संबंधीत आज दिनांक 7/3/2024 ला दिले. सोबत मनोज पवार सह शहर उपाध्यक्ष प्रज्वल जवरे, शहर सचिव क्रिश घोगरे, शहर सहसचिव विकास ठाकुर व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर निवेदन जिल्हा संपर्क प्रमुख राजपालभाऊ वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

