*श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच वंचितांचे खरे आधारस्तंभ.. विशाखाताई सावंग*
वंचित बहुजन महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर विशाखाताई सावंग यांनी तन-मन-धनाने पक्ष कार्याला वाहून घेतले. त्याचबरोबर सामाजिक, धार्मिक कार्यास सुद्धा त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्याचाच भाग म्हणून गावात त्यांनी महिला आघाडीची स्थापना करायला जोमाने सुरुवात केली. महिलांचं पहिल्यांदाच मजबूत संघटन करण्यासाठी त्यांचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. गावागावात ग्राम शाखा गठित करण्याचा त्यांनी चंग बांधला आहे.
नुकतेच रोहना या गावी ग्राम शाखा उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महिलांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. तमाम बहुजनांचे नेते आणि आधारस्तंभ बाळासाहेबच असल्याचे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे आणि बाळासाहेबांचे हात मजबूत करावे असे त्यांनी याप्रसंगी मत मांडले.
यावेळी काही मान्यवरांची भाषणे सुद्धा झाली.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा. अनिल अमलकार वंचितचे नेते, शेषराव सावंग जिल्हा उपाध्यक्ष, प्रभाकर वरखेडे तालुका अध्यक्ष महेंद्र सावंग सिने अभिनेता तथा सिने गायक संगीता गवार गुरु इंदुबाई वानखडे करुणा लांडगे सुमन लांडगे कंजारा करुणा सुरडकर निमकोहळा बेबीबाई इंगळे वरणा संगीता खंडेराव शिरसगाव देशमुख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गावातील असंख्य महिला पुरुषांची उपस्थिती होती. ग्राम शाखा अध्यक्ष जय माला सावंग, महासचिव सुपडाबाई पाटोळे, उपाध्यक्ष आशा सावंग, रमा सावंग ,केशर सावंग, प्रियंका सावंग ,शीला सावंग ,वर्षा वानखडे, आशा सावंग, विमल सावंग , सचिव म्हणून प्रमिला सावंग ,जयश्री सावंग,मनोरमा सावंग, चंदा सावंग , बबीता सावंग ,प्रमिला सावंग, पुष्पा सावंग, संघटक म्हणून सविता सावंग ,दुर्गा सावंग, सुवर्णा सावंग,सुमन सावंग, रंजना सावंग, लक्ष्मी सावंग ,आशा सावंग ,बेबी सावंग ,उषा सावंग, सदस्य म्हणून इंदू सावंग, दीक्षा नाईक, वंदना सावंग ,आम्रपाली सावंग ,सपना सावंग प्रमिला शेजोळे, शारदा सावंग ,विमल सावंग, वर्षा सावंग , शालू सावंग, लीला सावंग ,वर्षा सावंग, भागरता सावंग ,गीता सावंग ,सुशीला सावंग, ज्योती सावंग ,गीता सावंग ,सीमा सावंग ,लता सावंग, लीला सावंग तसेच वर्णा, दिवठाणा ,निमकोहळा, शिरजगाव देशमुख, कंझारा इत्यादी ग्रामशाखा पदाधिकारी यांच्यासह असंख्य महिला भगिनी उपस्थित होत्या.


