*ऐन निवडणूक काळात वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा (घाटाखाली) जिल्हा कार्यकारिणी बदल*
*अंतर्गत वातावरण तापल्यामुळे वंचितच्या बुलढाणा लोकसभा उमेदवाराला निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता*
वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वंचित घटकांना सत्तेत पोहोचवण्याचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे ध्येय आहे,आणि त्या ध्येयाच्या परिपुर्ती साठी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा घाटाखाली जिल्हा, तालुका पदाधिकारी जोमाने कार्य करित आहे
अल्पसंख्यांक ओबिसी समाजातून आलेले व पक्षात 40 वर्षापासून निष्ठावांत असलेले जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संपुर्ण जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबुत झालेली आहे, त्यात बुथ बांधणी, शाखा बांधणी, सर्कल निहायबांधणी, शाखा फलक, सत्ता संपादन मेळावे, संवाद मेळावे, कॉर्नर बैठकी, प्रशिक्षण मेळावे, विविध आंदोलने व जनसामान्याच्या हक्क्कासाठी लढा देऊन त्यांना न्याय मिळवून देत आहेत या माध्यमातून पक्षात जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे हे भरिव असे कार्य करीत आहेत
सद्यस्थितीत राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात ॲड.प्रकाश आंबेडकर यांचे प्राबल्य वाढलेले दिसुन येत आहे, आणि त्या अनुषंगाने लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी अनेक ठिकाणी लोकसभा उमेदवार उभे केलेले आहेत
आणि बुलढाणा लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंत राजाराम मगर या ओबीसी चेहऱ्याला उमेदवारी देण्यात आलेली आहे, वसंत मगर यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरण्यापासून तर निवडणूक प्रचार नियोजन करण्यापर्यंत जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे व जिल्हा कार्यकारणी परिश्रम घेत आहेत व मतदारापर्यंत पोहोचून आपला उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प घेत आहेत
एकूण सर्व मतदार संघात चांगली वातावरण निर्मिती झालेली आहे परंतु अशातच ऐन निवडणूक काळात ८ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी बुलढाणा जिल्हा कार्यकारणीत बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे गोंधळा सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे व सभ्रमावस्था पसरलेली आहे, एकूणच जिल्ह्यात योग्य दिशेने सुरू असलेल्या पक्षाच्या कार्याला व वाटचालीला थांबवण्याचा चुकीचा प्रकार करण्यात आलेला आहे त्यामुळे सर्व जिल्हा कार्यकारणीत नाराजीचा सूर आहे आणि सद्यस्थितीत होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही..!
त्यामुळे विद्यमान निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना बाजूला केल्यामुळे वंचितचे बुलढाणा लोकसभा उमेदवार वसंत मगर यांना निवडणुकीत मोठा फटका बसू शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे, या राजकीय वातावरण तापवण्यासारखा निर्णयाला व निर्माण झालेली गोंधळा सारखी परिस्थिती वरिष्ठाकडून कशी दूर केली जाईल व उमेदवाराला निवडणुकीत कोणताही धोका होऊ नये यासाठी काय निर्णय घेतात हे लवकरच समजेल.
