श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमातून संपन्न.
शेगाव:- आज दिनांक 10 मे 2024 रोजी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस विविध लोकोपयोगी उपक्रमानी यशस्वी संपन्न झाला सर्व प्रथम सकाळी 9.30 वाजता वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबीर घेण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, रुग्ण सेवक ,शहराध्यक्ष मो.सलमान,युवा तालुका उपाध्यक्ष शैलेश इंगळे, कालखेड ग्रामशाखा अध्यक्ष सुभाष तायडे, मो. अयाज,मंगेश सावळे सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी रक्तदान केले.त्यानंतर वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर यांचे वतीने सईबाई मोटे सामान्य रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप करण्यात आले.त्यानंतर जिल्हा समन्वयक डॉ प्रवीण पाटील साहेब यांचे वतीने तीन पुतळे परिसर येथे भव्य नेत्र तपासणी व पोटाचे विकार तपासणी शिबीर घेण्यात आले.यामध्ये 150 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. तसेच शहराध्यक्ष मोहम्मद सलमान यांचे वतीने गरजू रुग्णांना मोफत चश्मे वाटप करण्यात आले. यावेळी युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे,ज्येष्ठ नेते राजाभाऊ भोजने,राजेंद्र शेगोकर,डॉ.प्रविण पाटील,मो.सलमान शहाराध्यक्ष,तालुका अध्यक्ष दादाराव अंभोरे,युवा तालुका अध्यक्ष उमेश इंगळे,युवा शहराध्यक्ष संदेश शेगोकार,तालुका महासचिव दिपक विरघट, विठ्ठल पाटील, शैलेश इंगळे,युवा जिल्हा उपाध्यक्ष गौतम इंगळे, संगीता ससाणे,प्रितीताई शेगोकार, नीळकंठ पाटील, प्रभाकर पहुरकर,सुगदेव सोनोने,श्रीकृष्ण गवई,कैलास दाभाडे सम्यक विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष विशाल चोपडे, सह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


