महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव्ह क्षेत्रात सर्वात मोठी गुंतवणूक !
'एथर'चे महाराष्ट्रात सहर्ष स्वागत! मुख्यमंत्री श्री. देवेंद्र जी
फडणवीस.
एथर एनर्जीचे संस्थापक, श्री स्वप्नील जैन यांच्यासोबत बैठक झाली.
एनर्जी या अग्रगण्य इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनीने, आपल्या तिसऱ्या (फॅक्टरी) उत्पादन केंद्रासाठी महाराष्ट्रातील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीची (AURIC) निवड केली आहे.
महाराष्ट्रातील ही गुंतवणूक ₹2000 कोटीपेक्षा अधिकची असून, यामुळे जवळपास 4000 युवकांना रोजगारची संधी उपलब्ध होणार आहे.
या फॅक्टरीमध्ये दरवर्षी 10 लाख स्कूटर / बॅटरी पॅक अशी दुहेरी निर्मिती केली जाईल.
उद्द्योगांना अनुकूल आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या धोरणांना पोषक असे महाराष्ट्रातील वातावरण दाखवणारी ही गुंतवणूक मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या औद्योगिक वाढीच्या धोरणांशी सुसंगत आहे.
एथरने या गुंतवणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरची निवड केल्याने, येत्या काळात मराठवाडा महाराष्ट्राच्या विकासाचे नक्कीच नेतृत्त्व करेल, हा विश्वास आहे.
समृद्धी महामार्गाच्या प्रभावी कनेक्टिव्हिटीमुळे गुंतवणूकदार आता या भागात गुंतवणुकीला प्राधान्य देत आहेत.
ही गुंतवणूक महाराष्ट्राच्या 'इलेक्ट्रिक मोबिलिटी' क्रांतीत महत्त्वाची भूमिका बजावेल.
