महिलांनी जुमलेबाज सरकार पासून सावधान राहा - विशाखा ताई सावंग* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Tuesday, 2 July 2024

महिलांनी जुमलेबाज सरकार पासून सावधान राहा - विशाखा ताई सावंग*



 *महिलांनी जुमलेबाज सरकार पासून सावधान राहा - विशाखा ताई सावंग*


   हिंगणा कारेगाव   दि.1 /7/ 2024.

  वंचित बहुजन महिला आघाडीच्या हिंगणा कारेगाव येथील ग्रामशाखा फलकाचे उद्घाटन जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग यांच्या हस्ते झाले सर्वप्रथम गावामधून लेझीम ताशे सहित बोर्डा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली यामध्ये शाळेतील मुलींनी लेझीम खेळत विहारा पासून ते फलक ज्या ठिकाणी लावले होते तिथपर्यंत गावातून लेझीम खेळत खेळत जात असताना संपूर्ण गाव त्यांच्या मागे होते तसेच महिलांनी वंचित बहुजन आघाडीचे नारे व एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांचे नारे लावले फलकापर्यंत गेल्यानंतर मेणबत्ती अगरबत्ती लावून तसेच शांताराम पाटेखेडे यांनी नारळ फोडून तसेच विशाखाताई यांनी फीत कापून फलकाचे अनावरण केले पुन्हा विहारांमध्ये परत आलो आणि तिथं महामानवांच्या प्रतिमांचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विशेष करून अनिल अमलकर सर यांनी ग्वाही दिली की ज्या ज्या वेळी महिलांच्या फलकाचे उद्घाटन होईल त्या त्यावेळी मी माझ्या परीने काही ना काही मदत त्यांना करेल पश्चिम विदर्भाचे उपाध्यक्ष शरद भाऊ वसतकार यांनी एडिसन यांचे उदाहरण देऊन मुलींना खूप शिकवा व बाबासाहेबांनी सांगितलेल्या मार्गावर चला तसेच शांताराम पाटेखेडे यांनी युती का करू नये ?त्यामध्ये आपले किती तोटे आहेत? आणि बाळासाहेब युती का करत नाही? हे सांगितले तसेच संघपाल भाऊ जाधव यांचा वाढदिवस सर्व मान्यवरांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला तसेच हिंगणा कारेगाव येथील बुद्ध विहाराचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येईल असे सुद्धा आश्वासन दिले तसेच सुमनबाई थाटे यांनी बाळासाहेबांच्या प्रति कृतज्ञ राहा तरच आपले प्रगती आहे असे सांगितले तसेच विशाखाताई सावंग यांनी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा व उद्घाटक होत्या यावेळी त्यांनी महिलांना हे सरकार टारगेट करत आहे आणि महिलांच्या भरोशावर आपण निवडून येऊ यासाठी या बजेटमध्ये वेगवेगळ्या आश्वासनाचे गाजर या सरकारने दिलेले आहे अशा जुमलेबाज सरकारपासून आपण सावध राहा आणि वंचित बहुजन आघाडीलाच मत द्या हिंगणा कारेगाव हे वंचित बहुजन आघाडी ला प्रत्येक वेळेस एक नंबर ठेवते त्याबद्दल गावकरी वाशियांचे  ताईंनी अभिनंदन केले व स्वागत केले तसेच मनोहर भाऊ जाधव यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे कार्य व्यवस्थित सांभाळले तसेच सूत्रसंचालन सुद्धा चांगल्या रीतीने पार पडले आणि त्यांची महिलांना खूप मोठी मदत झाली त्याबद्दल विशाखा ताई यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले यावेळेस खूप मोठा जोराचा पाऊस येऊन सुद्धा कुणाचाच उत्साह कमी झाला नाही सर्वांनी अत्यंत उत्साहाने हा कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला व कार्यक्रम यशस्वी केला यावेळी खालील मार्गदर्शक या कार्यक्रमाला उपस्थित होते

 जिल्हाअध्यक्ष विशाखाताई सावंग, पश्चिम विदर्भ अध्यक्ष शरद भाऊ व सत्कार जिल्हा समन्वयक अनिल अमलकार जिल्हा नेते शांताराम पाटेखेडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती संघपाल जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुमनबाई थाटे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर जाधव, तालुका अध्यक्ष संगीता गवारगुरु, ज्योती वानखेडे शिराळा, गजानन जाधव, माणिक जाधव, ग्रामशाखा अध्यक्ष वनिता जाधव ,सुनिता जाधव, मायावती जाधव, छाया जाधव, गुणवंता जाधव, सुनिता जाधव, उर्मिला जाधव, ज्योती जाधव, आम्रपाली जाधव ,पद्मा जाधव ,दिपाली जाधव, गीता जाधव ,वंदना जाधव ,संगीता जाधव  आशा जाधव, मंधा जाधव, लता जाधव ,राजकन्या जाधव, सुजाता जाधव, उज्वला जाधव  छाया जाधव ,मंदा जाधव, अंजना जाधव, शुभांगी जाधव, व इतरही शेकडो महिला व लहान बालक बालिका व कार्यकर्ते गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी गावातील लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि एक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले