मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) *नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..!* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 29 July 2024

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष) *नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..!* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन*


 मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)


*नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..!*


*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन*


मुंबई ,दि. 28- 07- 2024

 पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि देशासाठी पदकांची लयलूट करतील असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनु भाकरचे अभिनंदन केले आहे.


महिला नेमबाज मनु भाकरने १० मीटर एअर पिस्तुल नेमबाजीमध्ये कांस्य पदक पटकावून या स्पर्धेतील भारतासाठी पहिले पदक मिळवले आहे. नेमबाज मनु भाकरची ही कामगिरी तमाम देशवासियांसाठी सार्थ अभिमानाची असल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. तिला स्पर्धेसाठी तसेच नेमबाजीतील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.