साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती मेहकर येथे मोठ्या उत्साहात तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यावतिने
साजरी !
बुलढाणा- मेहकर : दि.01/08/2024
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग व तथागत ग्रुपच्यावतिने मेहकर येथे मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ गवई यांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या फोटोला पुष्पहार अर्पन करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन व त्यांच्या चरणी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहून सर्वाना साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी संदिपभाऊ गवई यांनी आपले विचार व्यक्त करताना संगितले की,अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते त्यांचा जन्म सांगलीत 01 ऑगस्ट 1920 साली झाला. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही. मात्र अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थान आहे. त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत. एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषा आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी; लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. त्यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते.अण्णाभाऊ साठे यांच्या कविता आणि शायरी, पोवाडे आजही अभिमानाने गायले जातात. त्यांचे ‘माझी मैना’ हे मुंबईबद्दल लिहिलेलं गीत आजही अजरामर आहे. अण्णाभाऊ साठे यांची शिकवण आजही तेवढीच समायोजित असून आजच्या समाज जीवनाला व भविष्यातील आपल्या वाटचालीला कायमस्वरूपी दिशादर्शक असल्याचे मत तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी व्यक्त केले..
