*मा.अंकुश भाऊ राठोड यांचा मेहकर येथे मोठ्या उत्साहात वाढदिवस व तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई यांचा सत्कार समारंभ साजरा.*
मेहकर दि. 05-07-2024
मेहकर येथील शासकिय विश्राम गृह येथे तथागत ग्रुपचे सहकारी जिवलग भाऊ जिवाला जिव देणारे, सर्वाच्या सुख दू:खात धावून जाणारे, दिलदार मनाचे जिवलग मिञ दैनिक सेवाशक्ती टाइम्स चे मुख्य संपादक *मा.श्री.अंकुश भाऊ राठोड* यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदीप भाऊ गवई यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याबदल सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी, अँड. पांचाळ साहेब, अँड. मंत्री साहेब, गजाननभाऊ सरकटे, युनुसभाई पटेल, प्रकाशभाऊ सुखधाने, सुनिलभाऊ मोरे,मुन्नाभाऊ काळे, कुणाल माने,नवल राठोड, सुखदेेव ढाकरके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदीप भाऊ गवई आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना,दैनिक सेवाशक्ती टाईम्स,समस्त पत्रकार बांधव व मित्र परिवार उपस्थित होते..

