तथागत ग्रुप तर्फे सन्मानित डॉक्टरांचा सत्कार
कोल्हापूर दि.१/७/२०२४
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य कोल्हापूर ह्यांचे वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असलेल्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य कोल्हापूर ह्यांचे वतीने आज अरुण कदम सल्लागार तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य ह्यांचे हस्ते कोल्हापूर मधील डॉक्टर व्दारकानाथ कोटणीस आयसोलेशन हौस्पिटल कोल्हापूर येथे वेळोवेळी उल्लेखनीय समाज उपयोगी कामगिरी करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला.
ह्यावेळी राहुल चौधरी, अनिल शेरखाने, तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
