गोरगरीब लोकांची निराधार, श्रावणबाळ, अपंग निराधार त्वरीत वाटप करावे आशी मागणी- तथागत ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदिप गवई
मेहकर - मेहकर येथे सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तहसील कार्यालय येथे मा. तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे की, मागिल तीन महीन्या पासुन गोरगरीब लोकांची निराधार, श्रावणबाळ, अपंग निराधार बंद आसल्यामुळे त्या लाभर्थ्यांना त्वरीत लाभ देण्यात यावे.
ज्या लाभर्थ्यांनचे बोगस टिशा लावुन लाभ घेत आहे.आशा लाभर्थ्यांच्या टिशा तपासुन घेण्यात याव्या व बोगस लाभ घेणा-र्यावर कार्यवाही करण्यात यावी.
आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या व सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्यावतिने करण्यात येत आहे.
