*हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
.....श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निघालेली ओबीसी,एससी, एसटी. आरक्षण बचाव यात्रा दिनांक *06 ऑगष्ट 2024 रोजी बुलढाणा* जिल्ह्यात येत आहे
या आरक्षण बचाव यात्रेची बुलढाणा जिल्हा उत्तर विभागाची नियोजन बैठक हॉटेल हेरिटेज, खामगांव येथे संपन्न झाली या बैठकीत आरक्षण बचाव यात्रेत ओबीसी, एससी, एसटी बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले, सदर बैठकीचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष (उत्तर) देवाभाऊ हिवराळे, जिल्हा समन्वयक मा.डॉ.अनिलजी अमलकार, प्रा.डॉ.राजकुमार सोणेकर, जिल्हा महासचिव अतिशभाईं खराटे, ॲड.अनिल इखारे, जिल्हा प्रवक्ता ॲड.रवींद्र भोजने, युवा जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, महासचिव प्रकाश भिसे, महिला जिल्हाध्यक्षा विशाखाताई सावंग यांच्या मार्गदर्शनाखाली तथा ओबीसी नेते शांताराम पाठखेडे, गुरव महाराज, आनंदराव नागे, कृ.ऊ.बा.स. खामगाव उपसभापती संघपाल जाधव, सेवक सभापती राजेश हेलोडे, कलावंत समिती जिल्हाध्यक्ष महेंद्र सावंग, वंचित चे तालुकाध्यक्ष सुशील मोरे मलकापूर, संतोष गवई ज.जामोद, दादाराव अंभोरे शेगाव, अजाबराव वाघोदे नांदुरा, प्रभाकर वरखेडे खामगाव यांचेसह ओबीसी बांधव तथा जिल्हा,तालुका,शहर व आजी-माजी पदाधिकारी यांची उपस्थिती होती.


