राष्ट्रीय समाज पक्षाची सिंदखेडराजा विधानसभा बैठक संपन्न
सिंदखेडराजा:- राष्ट्रीय समाज पक्षाच्या 21 वर्धापन दिन 29 ऑगस्ट रोजी अकोला येथे पार पडणार आहे त्यानिमित्त सिंदखेडराजा येथे
येथे राष्ट्रीय समाज पक्षाची आढावा बैठक जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भाऊ भुसारी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली
यावेळी अतुल भाऊ भुसारी पाटील म्हणाले की सिंदखेडराजा विधानसभेत राष्ट्रीय समाज पक्ष उमेदवार देणार आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच वन बुथ टेन युथ या संकल्पनेतून विधानसभेत संघटन वाढवावे व राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार करावा असे आव्हान देखील केले.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे विधानसभा अध्यक्ष कारभारी गायकवाड राष्ट्रीय समाज पक्षाचे सिंदखेडराजा तालुकाध्यक्ष अध्यक्ष संतोष भाऊ वनवे सुनील तायडे
सुभाष पवार संदिप देशमुख गजानन नांगरे अर्जुन शिंदे गजानन गायकवाड तुकाराम काळे जास्त संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
