बुलढाणा शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आधार सेंटर वाढवा --- आम आदमी पक्षाची मागणी.
बुलढाणा - 21- 08 - 2024.
आज आम्हाला पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आज निवेदन देण्यात आले आहे त्यामध्ये जिल्ह्यामध्ये तसेच शहरांमध्ये आधार सेंटर वाढवण्याची गरज आहे
महोदय आम्ही वरील निवेदन सादर करतो की शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार अपडेट ची गरज आहे आधार सेंटर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आधार सेंटरवर जास्त प्रमाणात गर्दी होत आहे शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार लिंक असणे खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आधार सेंटरवर नागरिक रात्रीच नंबर लावण्यासाठी येत असे निदर्शनास आले आहे नागरिकांची कदापी गैर सोय होऊ नये यासाठी जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आधार सेंटर वाढवण्याची आवश्यकता आहे नागरिकांच्या हिताच्या विचार करून जिल्ह्यामध्ये ग्राहक सेवा केंद्र,, CSC सेंटर ,ई सेवा केंद्र यांना सुद्धा आधार सेंटर उपलब्ध करून देण्यात यावे करिता निवेदन सादर केले त्या ठिकाणी शेख इरफान, सईद शहा, विष्णू दांडगे, इस्माईल गवळी सलीम पठाण सोहेल गवळी प्रशांत मोरे प्रसाद घेवडे निवेदनावर यांचा सह्या आहेत.

