*राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी निर्मला तायडे*
*बुलडाणा/वार्ता*
*सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या निर्मला गणेश तायडे यांची राष्ट्रवादी महिला प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे ही निवड केली.*
*निर्मला तायडे या जामठी (धाड)सारख्या ग्रामीण भागात असताना सुद्धा त्यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क ठेवला आहे. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत त्या एकनिष्ठ असून कार्यरत आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर संघटनात्मक पातळीवर जबाबदारी देण्यात आली असता ती त्यांनी यशस्वीरित्या पार पडली. त्यामुळे आता त्यांच्याकडे राज्याची महिला सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी नियुक्तीपत्र दिले असून पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील माणसापर्यंत पोचविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.आपल्या निवडीचे श्रेय त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल व जिल्ह्यातील नेते आ.डॉ. राजेंद्र शिंगणे यांना दिले आहे.*

