अपघातात जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू .
आज की बात न्यूज चे मुख्य संपादक, तसेच समाजिक कार्यकर्ता श्री. मनोजजी बागडे यांनी परिवारातील सदस्यांना आणि नातेवाईकांना आज दिली भेट.
। शेगाव, दि. 18.10.2024।
खामगाव रस्त्यावरील नवोदय विद्यालयाजवळील यश ढाब्यासमोर १३ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास खामगाव रोडवरील यश धाब्या समोर रुग्णवाहिका व कार अपघात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा १५ ऑक्टोबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
मलकापूर येथून शेगाव येथे रुग्ण घेऊन येत असलेल्या रूग्णवाहिका क्र. एमएच ४६ के ५०८९ व समोरून येणाऱ्या कार क्रं. एमएच २८ एझेड ०१८३ ची समोरासमोर धडक झाली. यामध्ये रुग्णवाहिका चालक स्वप्निल राजू भिसे हे गंभीर जखमी झाले. तसेच रुग्णवाहिका व कारम धील प्रवासी सुध्दा जखमी झाले. या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरील भाग क्षतिग्रस्त झाला.
यामध्ये शेगाव येथील आम्रपाली नगर येथील श्रीमती मिना मधुकर वानखडे (५६), बाली दांडगे ह गंभीर जखमी झाले तर वैभव वानखडे हा किरकोळ जख्मी झाला. यातील गंभीर जखमी झालेल्या श्रीमती मिना मधुकर वानखडे यांना स्थानिक सोळंके खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तर बाली दांडगे अकोला येथे डॉक्टर भागवत यांच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर श्रीमती मिना वानखडे यांचा १५ ऑक्टोबर रोजी रात्री ७.३० वा मृत्यू झाला.
त्यांची अंतिमयात्रा त्यांचे राहते घर आम्रपाली नगर येथून निघून स्थानिक मुक्तीधाम स्मशान भूमीत जड अंतकरणात अग्नी दहन करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, आई वडील असा परिवार आहे.
आज की बात न्यूज चे मुख्य संपादक, तसेच सामाजिक कार्यकर्ता श्री. मनोजजी बागडे यांनी परिवारातिल सदस्यांना आणि नातेवाईकांना आज धावती भेट घेऊन विचारपूस केली. यावेडी तिसरा दिवस असल्यामुळें अनेक स्थानिक लोक आणि नातेवाईक हजर होते.
