*सत्कार कार्यकर्तुत्वाचा* *मा.आ.किरणराव सरनाईक शिक्षक आमदार अमरावती विभाग.यांचा सत्कार* *सोबत संघर्ष योद्ध्यांचा पण सत्कार* - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 19 October 2024

*सत्कार कार्यकर्तुत्वाचा* *मा.आ.किरणराव सरनाईक शिक्षक आमदार अमरावती विभाग.यांचा सत्कार* *सोबत संघर्ष योद्ध्यांचा पण सत्कार*

 






*सत्कार कार्यकर्तुत्वाचा*


*मा.आ.किरणराव सरनाईक शिक्षक आमदार अमरावती विभाग.यांचा सत्कार*


*सोबत संघर्ष योद्ध्यांचा पण सत्कार*


आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाचे दि 16/10/2024 पासुन हुंकार आंदोलन सुरू होते.या आंदोलनाच्या 56 व्या दिवशी कॅबिनेट निर्णय झाला.व दि 14/10/2024 ला शासन आदेश पण निर्गमित झाला.या आंदोलनाचे यश शिक्षकांनी 56 दिवस लढून खेचुन आनले.या कामी खुद्द आपल्या खात्याचे पालक म्हणुन मा.शिक्षणमंत्री महोदयांचे उपकार तर आपण आयुष्यभर विसरणारचं नाही.कारण त्यांनी या सरकारच्या अडिच वर्षाच्या कालखंडात.1160 कोटी.व 1104 कोटी असे दोन टप्पे दिले.

       या आंदोलन कालखंडात जेवढे दिवस शिक्षक आझाद मैदानावर लढले.तेवढे दिवस प्रामाणिक शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्य पुर्ण प्रयत्न करणारे.अमरावती विभागाचे सहृदयी शिक्षक आमदार मा.किरणराव सरनाईक साहेब.यांचे सहकार्य लाभले.त्याची उतराई म्हणुन.आज अकोला जिल्हा शिक्षकांकडून.त्यांचा सत्कार डवले ज्यु काॅलेज येथे आयोजीत केला होता.या ठिकाणी जिल्ह्यातुन मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थीती होती.कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्कार मुर्ती मा आ किरणराव सरनाईक साहेब यांचा सौ.मृणालीनी डवले व समन्वयक,तथा प्रमुख पाहुणे यांनी.सामुहिक सत्कार केला.या वेळी मंचकावर,मा आमदार महोदयांसोबत,समन्वयक,प्रा.

संतोष वाघ,प्रा गणेश ढोरे,प्रा पियुष तिरूख उपस्थित होते,तथा प्रमुख पाहुणे म्हणुन.श्री सुधाकरराव वाहुरवाघ,विभाग अध्यक्ष कृती समिती,श्री.पंकजभाऊ अग्रवाल,संस्थापक अध्यक्ष शिक्षकेत्तर संघटना,श्री सुरेशजी सिरसाठ,प्रांतिय पदाधिकारी कृती समिती,श्री दिपकजी बिडकर शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष,डाॅ.श्री.अभिजित डवले,उपस्थित होते,मा.आमदार महोदयांनी मंचकावर उपस्थित सर्व संघर्ष योद्ध्यांचे खुद्द सत्कार केले.लढाई तुमची सहकार्य आमचे या शब्दात प्रतिनिधी म्हणुन माझ्या सत्कारा पेक्षा तुमच्या संघर्षाचे.समन्वय संघाचे.लढवय्या सर्व शिक्षकांचे हे यश आहे.असे मत व्यक्त केले.म्हणुनच सर्वांनी मोठ्या मनाचा मानुस म्हणुन आमदार किरणराव सरनाईक साहेबांचा गौरव केला.या नंतर सर्व मंचकावर उपस्थित प्रमुखांचे मनोगते झाली.जि आर संबंधी सर्व माहिती दिली.व अध्यक्षीय भाषण मा.आ.किरणराव सरनाईक साहेबांचे झाले,या पुढे संचमान्यता.कॅप.संचमान्यता,पुढील कार्यवाही व पत्राचे वितरण या सर्व बाबी आम्ही करून घेऊ म्हणुन सांगितले,कार्यक्रमाचे संचालन सौ निवाने मॅम यांनी केले.तर आभार प्रदर्शन सौ श्वेता तायडे मॅम यांनी केले.सत्कारमुर्ती मा.आ.सरनाईक साहेब यांच्यावर तथा शिक्षकांच्या आंदोलनावेळी शासनाला आवाहन म्हणुन सौ देशपांडे मॅम यांनी तयार केलेल्या कवितांना सर्वांनी दाद दिली.