देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी केले बेताल वक्तव्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केला अपमान तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटने तर्फे अमित शाह यांचा जाहीर निषेध करण्यात येणार असल्याचे संदिप गवई यांनी सांगितले
मेहकर - दि.16-12-2024
भारतीय जनता पार्टी चे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा जाहीर निषेध नोंदविण्यात येनार असल्याचे सांगण्यात आले तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला आघाडी यांनी जिल्हाच्या, तालुकाच्या व शहराच्या ठिकाणी निषेध नोंदवावा असे आवाहन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्वे सर्वा संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी केले आहे. संसद मध्ये बोलताना आपल्या भारत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी एक बेताल वक्तव्य करून चुकीचे विधान करून संविधान चे जनक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अपमान जनक बेताल वक्तव्य केलेले आहे त्यामुळे फुले शाहू आंबेडकर वादी आंबेडकर प्रेमी यांच्या मध्ये एक रोष निर्माण झाल्याचे दिसून येत आहे अमित शाह संसद मध्ये बोलत असताना असे म्हणाले आता आंबेडकर आंबेडकर आंबेडकर हे एक फॅशन झालेली आहे एवढ्या वेळेस जर तुम्ही देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असा द्वेष करत असे बेताल भडकाऊ चुकीचे विधान भाजपा चे नेते अमित शाह यांनी केले आहे शाह यांना सत्तेचा व पदाचा माझ आणि गर्व आहे का ?? हा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे कदाचित त्याच मुळे हे असे बेताल वक्तव्य शाह यांनी केले असावे. अमित शाह यांचा मेहकर येथे जाहीर निषेध करण्यात येत आहे तरी सर्व लोकशाही वादी, फुले, शाहू, आंबेडकर वादी, या सर्वांनी जमून आपला जाहीर निषेध नोंदवा वा असे जाहीर आवाहन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अध्यक्ष संदिप गवई यांनी केले.
