आज सायंकाळी अमरावती रेल्वे स्थानकावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर (मुंबई) करिता धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या लोको पायलट व असिस्टंट लोको पायलटचा खासदार श्री.बळवन्तजी वानखडे यानीं सत्कार केला.
अमरावती - दि .05-12-2024
आज सायंकाळी अमरावती रेल्वे स्थानकावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर (मुंबई) करिता धावणाऱ्या विशेष रेल्वेच्या लोको पायलट व असिस्टंट लोको पायलटचा खासदार श्री.बळवन्तजी वानखडे अमरावती लोकसभा क्षेत्र यांनी सत्कार करुन, रेल्वेतील प्रवाशांना पाण्याच्या बोटल्स चे वाटप करून या अमरावती - दादर विशेष रेल्वेस झेंडा दाखवून मोठ्या उत्साहात रवाना केले. यावेळी प्रामुख्याने - एम एस लोहकरे ( स्टेशन मास्तर अमरावती रेल्वे स्थानक), डि.के. मिना ( वाणिज्य निरीक्षक), हरिभाऊ मोहोळ (माजी सभापती जि. प. अमरावती), रामेश्वरभाऊ भयंकर, सलीम खान, आकाश गवई (कमर्शियल इन्स्पेक्टर भुसावळ), प्रवीणभाऊ मनोहरे, आपताब खान (बडनेरा), जयश्रीताई वानखडे तसेच मोठ्या संख्येने अमरावती शहरातील नागरिक या वेळी उपस्थित होते.

