*🔹दिनांक 8 व 9 जुलै रोजी शाळा बंद आंदोलनामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करू नये: श्री किरणरावजी सरनाईक🔸*
--------------------------------------------
*🔸मा.ना.श्री दादाजी भुसे, शालेय शिक्षणमंत्री, यांना निवेदन सादर🔹*
--------------------------------------------
अनुदान टप्पा वाढ तात्काळ मिळण्यासाठी दिनांक आठ व नऊ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दिनांक नऊ जुलै रोजी शासनाने अनुदान टप्पा जाहीर केला.
मात्र शिक्षण संचालनालयामार्फत पत्र निर्गमित करण्यात आले की दिनांक आठ व नऊ जुलै रोजी ज्या शाळा बंद होत्या व जे कर्मचारी अनुपस्थित होते त्यांचे वेतन कपात करण्यात यावे. या आदेशानुसार सर्व वेतन पथक अधीक्षकांनी माहे जुलै चे वेतन आदेश त्याच स्वरूपाचे काढले आहेत.
त्यामुळे मा.श्री किरणरावजी सरनाईक यांनी दिनांक 14 जुलै रोजी मा.श्री दादाजी भुसे साहेब शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर करून 8 व 9 जुलै रोजी चे कुणाचेही वेतन कपात करू नये अशी विनंती केली आहे.
-------------------------------------------
*अमरावती विभागीय शिक्षक संघ*
