रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने उपविभागीय कार्यालय मलकापूर ला आज दि 28-07-2025 ला निवेदन देण्यात आले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 28 July 2025

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने उपविभागीय कार्यालय मलकापूर ला आज दि 28-07-2025 ला निवेदन देण्यात आले.



 


*गाय चोरीच्या संशयावरून धर्म विचारत दलीत तरुणाला तीन तरुणांकडून बेदम मारहाण.*

*धर्म तपासण्यासाठी तरुणाला नग्न करण्यात आल.*

*खामगाव शहरातील घटना, घटनेने खामगाव शहरा सह सम्पूर्ण जिल्ह्यात खळबळ.*

*रिपब्लिकण पार्टी ऑफ इंडिया आणि तथागत ग्रुप सामाजिक संघटनेचा जाहिर निषेद .*

*मलकापूरला उपविभागीय कार्यालयात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक सेल रि.पा.ई. कार्याध्यक्ष जलीलखान यांच्या सह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हजर*

*मलकापूर - दि 28-07-2025*

खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून रात्री एका 24 वर्षीय दलित तरुणाचं अपहरण करून सुरुवातीला त्याला जवळच असलेल्या मैदानात नेऊन त्याचा धर्म व जात विचारत जबर मारहान करण्यात आली इतकंच नाही या तरुणाचा धर्म तपासण्यासाठी त्याला नग्न करत मैदानात असलेल्या गायींसोबत त्याचे नग्न व्हिडिओ व फोटो काढण्यात आले नंतर पुन्हा त्या तरुणाला तीन किमी अंतरावर नेन्यात आल तिकडेही या तरुणाला नग्न करत मारहाण करण्यात आली….नशिबाने गस्तीवर असलेल्या पोलीस व्हॅन चा सायरन वाजल्याने या तरुणाचा जीव वाचला….ही धक्कादायक घटना तीन पोलीस स्टेशन , उपविभागीय पोलिस अधिकारी व अप्पर पोलीस अधीक्षक असलेल्या खामगाव शहरात घडली आहे. 

या मारहाणीत या दलीत तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाच हाड ही मोडल आहे. सध्या या तरूनावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.रोहन पैठणकर अस या तरुणाच नाव असून तो एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतो आणि आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतो.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या वतीने उपविभागीय कार्यालय मलकापूर ला आज दि 28-07-2025 ला निवेदन देण्यात आले. 

आज रिपब्लिकण पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक च्या वतीने खामगांव ला दलित युवकावर झालेला अन्याय च्या बाबद कारवाही करण्या करिता निवेदन देण्यात आले. 

यावेळी रि.पा.ई. चे जिल्हा अध्यक्ष गुफरानखान :  अल्पसंख्यांक सेल ,
जलिलखान : महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक सेल रि.पा.ई. कार्याध्यक्ष ,

ॲड.मनोज बागडे,रि.पा.ई. - बुलढाणा जिल्हा महासचिव,उत्क्रांतीवाद पत्रकार महाराष्ट्र राज्य संघटना - महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष,तथागत ग्रुप महाराष्ट्र (ऑल इंडिया कार्यरत)- महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,मुख्य सपांदक - आज कि बात न्यूज,ऑल इंडिया मीडिया असोसिएशन - सोशल मीडिया कार्यकर्ता*

शे.तसलिम शे. कलिम
जिल्हा अध्यक्ष अपंग रि.पा.ई. व शेख सलीम शेख अहमद, सलीम खान बने खान , जफर खान मलकापूर शहर अध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ता हजर होते .