डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणांमध्ये रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशील केलेल्या वक्तव्याबाबत त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हाकालपट्टी करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये घाटाखालील काही तालुक्यात निवेदन देण्यात आले. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 14 November 2025

डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणांमध्ये रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशील केलेल्या वक्तव्याबाबत त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हाकालपट्टी करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग यांच्या नेतृत्वामध्ये घाटाखालील काही तालुक्यात निवेदन देण्यात आले.

 




डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणांमध्ये रूपाली चाकणकर यांनी असंवेदनशील केलेल्या वक्तव्याबाबत त्यांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हाकालपट्टी करण्यात यावी यासाठी वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने बुलढाणा जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग  यांच्या नेतृत्वामध्ये घाटाखालील काही तालुक्यात निवेदन देण्यात आले.

            राज्यात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्या सुरक्षतेसाठी न्यायासाठी आवाज उठवला तर पोलिसांच्या माध्यमातून महायुती सरकार हल्ले घडवून आणणार का सहा तारखेला मुंबईमध्ये महिला आघाडीच्या वतीने केलेले मोर्चामध्ये वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी हात उचलले व अत्यंत नीच वागणूक दिली डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केलेले बेजबाबदार व असंवेदनशील वक्तव्य अत्यंत निषेधार्थ आहे या प्रकरणात मुख्यमंत्री जबाब द्या आणि दोषी पोलिसांवर त्वरित कारवाई करा वंचित बहुजन महिला आणि बुलढाणा च्या वतीने ह्या आंदोलन करण्यात येत आहे तसेच मुंढवा पुणे येथील 43 एकर जमीन ज्या जमिनीची किंमत 1800 कोटी रुपये आहे जी सरकारने भाड्याने घेतली होती महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार याची हिस्सेदारी या जमीन खरेदी प्रकरणांमध्ये 99 टक्के आहे आणि मूळ किंमत 1800 करोड रुपये  असून सुद्धा त्यांनी  पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर एवढ्या मोठ्या जमिनीचा व्यवहार केला झालेल्या भ्रष्टाचारावर महाराष्ट्र राज्य सरकारने अजून पर्यंत पार्थ पवार यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली केलेले नाही तरी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने आम्ही पार्थ पवार याला त्वरित अटक करण्यात यावी असे आम्ही महिला आघाडीच्या वतीने मागणी केली खामगाव मध्ये या निवेदनावर खालील सह्या होते जिल्हाध्यक्ष विशाखाताई सावंग,सुमनबाई थाटे, भारतीय बौद्ध  महासभा शहर अध्यक्ष दादाराव हेलोडे, धम्मपाल गवई ,तालुका अध्यक्ष संगीता गवारगुरु,सपना गवई, सविता सोळंके, शकुंतला चव्हाण, निर्मला लांडगे, सोनम इंगळे, पद्मिनी इंगळे, सिंधुताई ठाकरे, मंगला शिरसाठ, सत्यभामा शेगोकार, सुमन शिरसाठ, लक्ष्मी शिरसाठ, प्रमिला सूर्यवंशी, सिंधुबाई शिरसाट, निर्मला हिवराळे, सुवर्णा शेगोकार सत्यभामा शेगोकार मोहन शेगोकार, भास्कर शिरसाट,करुणा लांडगे, लता बाई घटे, उषा पिंजरकर, मालू ठाकूर, विश्वनाथ तिडके, ओंकार पाटील, शालिनी सावंग, बळीराम  हिवराळे, अंबादास सावंग,व इतर अनेकांच्या सह्या होत्या