उपोषणकर्त्याच्या मागण्या मान्य करून तांडा वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करा अन्यथा चक्काजाम... अतिशभाई खराटे
मलकापूर प्रतिनिधि :( बेलाड ) २०/०२/२०२३
बेलाड ता. मलकापूर येथील तांडा वस्तीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी या मागणीसाठी मलकापूर तहसील कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने 20 फेब्रुवारी पासून महिला नेत्या दीपमाला इंगळे यांच्या नेतृत्वात महिलानी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे
मौजे बेलाड वार्ड क्रमांक एक मध्ये कॉटन मार्केट समोर तांडा वस्ती मध्ये नाथ जोगी समाजाचे लोक अनेक वर्षापासून वास्तव्यात आहे व तेथील मतदार सुद्धा आहेत परंतु तेथील नागरिकांना ग्रामपंचायत तर्फे अजूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही तेथील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे याबाबत मागील कित्येक वर्षापासून बेलाड ग्रामपंचायतला व गटविकास अधिकारी पंचायत समिती मलकापूर यांना सुद्धा वारंवार मागणी करून निवेदन देण्यात आले आहे परंतु प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल न घेता त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत त्यांना पिण्याच्या पाण्यापासून व मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवण्याचे कार्य केलेले आहे त्यामुळे या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित करावी या मागणीसाठी ग्रा.पं.सदस्या दीपमाला इंगळे व तांडा वस्तीतिल भारती आबाराव सावंत, विमलबाई मंगल जगताप, ताई बाबुराव सावंत, गंगुबाई वामन शिंदे या महिला उपोषणास बसलेल्या आहेत
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी या उपोषणास भेट देत प्रशासनाचा निषेध केला व उपोषणकर्त्याची मागणी त्वरित मान्य करून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन व चक्काजाम करण्याचा इशारा दिला, यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुशीलभाऊ मोरे, जि. उपाध्यक्ष यशवंत कळासे, जि.संघटक भाऊराव उमाळे, जि. सचिव तुळशीराम वाघ, ता.उपाध्यक्ष विलास तायडे, गजानन झणके, शेख यासीन कुरेशी, जनार्दन इंगळे, शहराध्यक्ष अलमनुरबी, प्रवीण के. इंगळे, सुपर ब्राह्मणे नानाराव इंगळे,आबाराव सावंत, अनिल तायडे, देवानंद इंगळे, किशोर मोरे,अजाबराव इंगळे, राजू शिंदे,मंगल जगताप, राम शिंदे,हिम्मत जगताप यांच्यासह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते, यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठिंबा ददर्शविला आहे.
