पत्रकार गोपाल तुपकर याचा सामाजिक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमास दिले रु.पाच हजार दान - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 1 April 2023

पत्रकार गोपाल तुपकर याचा सामाजिक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमास दिले रु.पाच हजार दान


 पत्रकार गोपाल तुपकर याचा सामाजिक उपक्रम

वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमास दिले रु.पाच हजार दान

चिखली प्रतिनिधी : पत्रकार जगतात आगळावेगळा ठसा उमटून सर्व सामान्य जनतेच्या हृदयात जागा करून आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देणारे सी सी एन न्यूज चे एडिटर इंन चीफ तसेच टीव्ही जनरलिस्ट संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार गोपाल तुपकर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विनाकारणचा खर्च न करता आपले सामाजिक दायित्व समजून ऋनाणुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचलित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील वृद्धाच्या सेवेसाठी रुपये पाच हजार दान देऊन वाढदिवस साजरा केला आहे.

तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे हे स्वखर्च व लोकवर्गणीतून निराधार बेघर बेसहरा वयोवृद्धाची निःस्वार्थ अविरत सेवा करीत आहे. ज्या आई वडिलांनी जन्म देऊन जग दाखवील अश्या मायबापांना बेवारस सोडून दिले अश्या वृद्धानाची सेवा त्यांच्या कडून होत आहे. त्यांच्या या कार्यास आपले सामाजिक दायित्व समजून वृद्धाश्रमातील वृद्धाच्या सेवेकारिता तुकाराम आश्रय वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांच्याकडे रुपये पाच हजार दान देऊन चिखली तालुक्यातील इतर दानशूर व्यक्ती यांनी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमास शक्य ती मदत करून सहकार्य करावे असे भावनिक आव्हान सुद्धा गोपाल तुपकर यांनी या वेळी केले. सोबत तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष योगेश शर्मा, पत्रकार संतोष लोखंडे, पत्रकार रवींद्र फोलाने, पत्रकार कैलास गाडेकर, पत्रकार नितीन फुलझाडे, शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक, हातनी गावाचे तलाठी विकास कस्तुरे, भाजपचे ऍड. दिलीप यंगड, पत्रकार पीयूष भीमेवाल,पत्रकार गजानन पठाडे, पत्रकार इम्रान शाह यांच्यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते.