पारिजात विद्यालय,मनसगाव येथे प्राचार्य श्री. निलकंठ धुमाळे सर,श्री. ओरा चक्रे सर व सौ.विद्याताई देशमुख मॅडम यांना सेवानिवृत्ती निरोप
मनसगाव प्रतिनिधी : दि.०१.०४.२०२३ ,
मातोश्री शिक्षण सेवा मंडळ,कौलखेड अकोला द्वारा संचालित पारिजात विद्यालय तथा कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.नीलकंठ धुमाळे सर,शिक्षिका सौ.विद्याताई देशमुख मॅडम ,प्राजक्ता विद्यालयाचे शिक्षक श्री.ओरा चक्रे सर या सर्वांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ पारिजात विद्यालय ,मनसगाव येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी आयोजित निरोप समारंभा साठी मातूश्री शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाशराव जी देशमुख साहेब,सचिव.सौ.नलिनी ताई देशमुख मॅडम, सत्कारमूर्ती अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्री.किरणराव सरनाईक साहेब,प्राजक्ता विद्यालयाचे प्राचार्य.श्री सागर देशमुख सर,शाळा समिती अध्यक्ष श्री.भारतभाऊ कंकाळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत सौ.नलिनी ताई देशमुख मॅडम यांनी सेवा निवृत्त झालेल्या शिक्षकांच्या कार्याला उजाळा दिला.शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्री.किरण राव सरनाईक यांनी मार्गदर्शन करतांना शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.इतर शिक्षकांना देखील उत्कृष्ट कार्य करण्याची प्रेरणा दिली.जीवन यशस्वी करण्यासाठी शाळा महत्त्वाची भूमिका बजावते.अशा शाळेला आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.अध्यक्षीय भाषणात श्री.प्रकाश राव देशमुख साहेब म्हणाले,निष्ठेने कर्तव्य पूर्ण केल्यास जो आनंद होतो तोच आनंद आज होत आहे.गेली 33 वर्ष श्री.धुमाळे सर यांनी सेवा दिली त्यांच्यावर सोपविलेले कार्य त्यांनी निष्ठेने ,प्रामाणिकपणे केले.साहेबांनी सेवा निवृत्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला.उपस्थित श्रोतावर्ग भारावून गेला.
कार्यक्रमाला उपस्थित सर्व उत्सवमूर्तीचा अमरावती विभागाचे शिक्षक आमदार श्री. किरणराव सरनाईक यांच्या हस्ते सहपरिवार सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या सचिव सौ.नलिनी ताई देशमुख मॅडम आणि उत्सवमूर्ती श्री.धुमाळे सर यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला.
यावेळी पारिजात विद्यालयाचे प्राचार्य.श्री. खुणे सर.मातोश्री महाविद्यालयाचे प्राचार्य.श्री.खंडेराव सर,मातोश्री अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य.श्री.देशमुख सर,मातोश्री इंग्रजी प्राथमिक शाळा प्राचार्य.श्री. समदूर सर ,गावातील सरपंच,प्रतिष्ठित नागरिक,शिक्षकवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कराळे सर यांनी केले.आभारप्रदर्शन श्री.इंगळे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.
