मेहकर दरेगाव जालना बस शुरु करा ,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मेहकर आगार व्यवस्थापक यांना निवेदन
मेहकर प्रतिनिधि: दि.२९/०४/२०२३
मेहकर दरेगाव जालना हि बस सिंदखेडराजा तालुक्यातील ग्रामीण भागातुन जात असल्यामुळें नागरीकांना व विध्यार्थ्यांना प्रवासासाठी सोयीची आहे परंतु काही दिवसापासून सदर बस बंद असल्यामुळें दि.२९/०४/२०२३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लक्ष्मण भाऊ जाधव यांच्या नेतृत्वात जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राधेश्याम बंगाळे पाटील यांनी आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले.
निवेदन देऊन बस सेवा शुरु करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली सदर बस शूरु न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल व मेहकर आगारातील एक हि बस बाहेर पळू दिला जाणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक यांना देण्यात आला.
यावेळी महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
