वृद्धाश्रमातील वृद्धासोबत केला वाढदिवस साजरा
पत्नी च्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमास आर्थिक मदत
खंडाळे दाम्पत्या चा स्तुत्य उपक्रम
चिखली प्रतिनिधि :- दि.०२/०५/२०२३
सामाजिक कार्याची जान ठेवत पत्नी च्या वाढदिवसाला पत्नी, मुल व इतर नातेवाईक यांना मोठया हॉटेल मध्ये मेजवानी न देता होणारा अनाठाई खर्च न करता मुलांन सह समाजात आदर्श निर्माण करीत ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील वृद्धा सोबत पत्नी चा वाढदिवस साजरा करून वृद्धाश्रमास पाच हजार रुपये ची आर्थिक मदत केली.
सविस्तर असे कि वित्त विभागातुन सेवा निवृत्त झालेले उपकोषागार अधिकारी देवानंद खंडाळे हे नोकरीत असताना पासून सामाजिक धार्मिक कार्यात सदा अग्रेसर आहे गरजूना भोजन कपडे आर्थिक मदत बहुजन चळवळीला शक्य ती मदत करून सहकार्य करणारे समाजसेवक यांनी पत्नी च्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धासोबत वाढदिवस साजरा केला यां वेळी वृद्धाश्रमातील वृद्धा च्या चेहऱ्यावर अति प्रसन्नता दिसून आली.
देवानंद खंडाळे यांनी दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे करून सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी वृद्धाश्रमातील संख्या बघून त्यांच्या पत्नी सुनंदा खंडाळे भारावून गेल्या त्यांना अश्रू अनावर झाले असे कसे आपल्या जन्म दाते आई वडील यांना मुलं वृद्धाश्रमात सोडतात हे पाहून त्यांना खूप दुःख वाटले याउलट वृद्धाश्रमातील वृद्धाची सेवा बघून प्रशांत डोंगरदिवे व रुपाली डोंगरदिवे यांचे कौतुक केले यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धासह देवानंद खंडाळे, सुनंदा खंडाळे हर्ष दीप खंडाळे, बागेश्री खंडाळे, ग्रामपंचायत सदस्य संदीप डोंगरदिवे, राजू डोंगरदिवे, द्वारका घेवंदे, कावेरी डोंगरदिवे, विहान डोंगरदिवे, उत्तम महाराज डोंगरदिवे, देऊबाई डोंगरदिवे, हे उपस्थित होते कार्यक्रम चे सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे यांनी तर आभार प्रदर्शन प्रियांका वानखेडे यांनी केले.

