निराधार वृद्धाना वृद्धाश्रमात मिळाला आश्रय
चिखली -:- ११/०५/२३
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथे एकच दिवशी चार निराधार बेसहारा निराश्रित वयोवृद्ध पती-पत्नी यांना गोदरीचे सरपंच भरत जोगदंडे यांच्या मदतीने मिळाला आश्रय.
ढसाळवाडी येथील अमृता गायकवाड यांना सात मुली जावई नातवंड असून आई बाबा चि काळजी करीत नही बाबा अर्धांगवायू रोगाने त्रस्त तर आई च्या डोळ्याची शश्रर्क्रिया झालेली असताना सात मुली पैकी कोणीच देखभाल करायला तयार नाही. तसेच लक्षिमन सोनावणे व सुभाबाई सोनावणे यांचा मुलगा मयत असल्याने देखभाल करायला कोणीच नाही अशा परिस्थितीत या दोघां वयोवृद्ध जोडप्यांची भेट गोदरी चे सरपंच भरत जोगदंडे याच्याशी झाली त्यांनी आपली कथा त्यांना व्यक्त केली असता त्यांना अश्रू अनावर झाले. त्या वृद्धानी आम्हाला आश्रम मध्ये पाठविण्याची विनंती केली. क्षणाचाही विलंब न करता लगेच निराधार वृद्धा ची निशुल्क निःस्वार्थ सेवा करणारे तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर चे संचालक प्रशांत डोंगरदिवे याच्याशी संपर्क केला असता त्या निराधार वयोवृद्ध यांचि व्यथा ऐकून त्यांना तात्काळ वृद्धाश्रमात आश्रय देण्यात आला. यावेळी गोदरी चे सरपंच भरत जोगदंडे, सरपंच भोकर गजानन फोलाने, सुदर्शन कऱ्हाडे, किरण नाईक, भारतीय सैन्यात सेवारत अक्षय डोंगरदिवे, ऋषिकेश चोथमोल, सागर इटकर, स्वप्नील मोरे राजू कऱ्हाडे यांची विशेष उपस्थिती लाभली.
