तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे विविध ठिकाणी स्तुत्य उपक्रम साजरे.
छत्रपती संभाजीनगर : - दि. ०५/०५/२३
छत्रपती संभाजीनगर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने तथागत भगवान गौतम बुद्ध पोर्णिमेच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर येथील बाल सदन गृह येथील मुलांना वही पेन वाटप करण्यात आले व मराठवाडा विभाग अध्यक्ष मा.संतोष खरात यांच्या वाढदिवसानिमित्ताने तथागत ग्रुप महाराष्ट्र महासचिव अँड देवकांत मेश्राम छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष सय्यद रियाज भाई या सर्व मान्यवरांच्या हस्ते फळ वाटप केले व सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. आणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय.संदिप भाऊ गवई यांच्या नेतृत्वाखाली तथागत ग्रुप संघटनेच्यावतीने असे घोषित करण्यात आले की बाल सदन गृह येथील मुलांचे दहावीच्या पुढचे शिक्षण हे तथागत ग्रुपच्या वतीने करण्यात येणार आहे व प्रत्येक महिन्यात अनाथ मुलांना भेट घेऊन शिक्षण व प्रशिक्षण देण्याचे काम संपूर्ण महाराष्ट्रातील बाल सदन गृह येथे राबविण्यात येतील..
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र महासचिव अँड देवकांत मेश्राम साहेब,तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष सय्यद रियाज भाई, छत्रपती संभाजीनगर शहर अध्यक्ष मा.अंकुशदादा हिवाळे, मराठवाडा संपर्क प्रमुख मा.अमोल चव्हाण,गंगापूर तालुका अध्यक्ष मा.सुभाष गाडेकर,पैठण तालुका अध्यक्ष मा.महेश अवारे आदी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच बाल सदन गृह येथील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


