स्वाभिमानाने जगणं शिकवणारे, स्वाभिमानी नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस मलकापूर मध्ये विविध कार्यक्रमांनी साजरा
मलकापूर प्रतिनिधि - १०/०५/२०२३
सर्वसमावेशक राजकारण,आणि स्वाभिमानाने जगणं शिकविणारे, समस्त बहुजनांचे कोहिनूर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वाभिमानी नेते आदरणीय श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या 68 वा वाढदिवस वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे तथा भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. वले सर, जिल्हा संघटक भाऊराव उमाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तथा गरजू व्यक्तींना जीवनावशक्य वस्तूचे वाटप करण्यात आले
यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांच्या उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या, या कार्यक्रमास कार्यक्रमाचे आयोजक वंचित बहुजन आघाडीचे मलकापूर तालुका अध्यक्ष सुशीलभाऊ मोरे यांच्यासह युवा तालुकाध्यक्ष भारत झाल्टे, ता. उपाध्यक्ष विलास तायडे,ता. विधी सल्लागार एड. सुबोध इंगळे, महासचिव नरसिग चव्हाण, शहर महासचिव अतुल पाचपोळ ता.सचिव गणेश सावळे, दगडूजी राणे, ता उपाध्यक्ष अक्षय इंगळे,भा.बौ.म.ता.सरचिटणीस जी.एन.इंगळे सर, के.यु.बावस्कर सर, दादारावजी राणे, आकाश इंगळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

