तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने शुभविवाह सोहळ्यास धम्मदान स्वरूपात मदत..
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई हे संघटनेच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील लोकांनसाठी मोलाचे कार्य करत आहेत..
बुलढाणा :- १२/०५/२३
बुलढाणा ता.संग्रामपूर तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्यामाध्यमातुन रा.टाकळेश्वर चौडी ता.संग्रामपूर जि.बुलढाणा चि.सौ.का.नेहा उर्फ भाग्यश्रीताई शिवहरी पवार व कार्तिक गजानन बंड यांच्या या शुभविवाह सोहळ्यास तथागत ग्रुपच्या वतीने धम्मदान स्वरूपात मदत केली कारण मुलीचे वडील हे कोरानोच्या काळात वारले व मुलीच्या पाठीमागे कुठलाही आधार नसल्याने त्यांची परीस्थिती ही बिकट असल्याने या मुलीच्या विवाह सोहळ्यानिमित्त तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांनी या मुलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली व सर्व सहकारी हे त्यांच्या मदतीला सरसावले या विवाह सोहळ्याला तथागत ग्रुपच्या वतीने पाचशे ते सहाशे गावातील व पाहुणे मंडळीना भोजदानाचा खर्च ऊचलुन एका मुलीलातीच्या आयुष्याची सुरुवात करून देण्याचे काम या संघटनेने केले व सर्वात मोठे मोलाचे योगदान संघटनेतील सर्व पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी व सदस्यांनी या विवाह सोहळ्याला केले या विवाह सोहळ्याला वधु वरांस आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई,महाराष्ट्र राज्य महासचिव मा.गौतम नरवाडे,महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख मा.राधेश्यामजी खरात,अकोला जिल्हा अध्यक्ष मा.सुनील भाऊ वनारे,मेहकर तालुका अध्यक्ष मा.सचिन भाऊ गव ई व गावातील प्रतिष्ठित नागरिक व समस्त गावकरी मंडळी या सोहळ्यानिमित्त उपस्थित होते..

