अतिशभाई खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत
तालसवाडा येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना
मलकापूर प्रतिनिधी : - ०५.०५.२३
मलकापूर तालुक्यातील तालसवाडा येथे नव्यानेच बांधलेल्या विहारात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली
कार्यक्रमाचे उद्घघाटक भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष एस. एस. वले सर, प्रमुख अतिथी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष राजु शेगोकार, भदंत महानाम यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण करण्यात आले
यावेळी तालसवाडा गावातून बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली गावातील व पंचक्रोशीतील उपासक उपासिका तथा भारतीय बौद्ध महासभेचे तालुका, जिल्हा पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शुभ्र वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते
मार्च महिन्यात येथे श्रामनेर शिबिरात तरुण मुलांनी श्रामनेर दीक्षा घेतली त्यानंतर गावातील उपासक उपासिका नियमितपणे विहारात जाऊन गाथाचे पठण करू लागले, लोक व्यसनमुक्त झाले यामध्ये उपासिकांचा मोलाचा वाटा आहे त्याचाच परिणाम म्हणून आज तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली
यावेळी अतिशभाई खराटे, एस. एस. वले सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस जी.एन. इंगळे, कोषाध्यक्ष एम.एस.वाघ, संस्कार सचिव एस.बी.निकम, वंचितचे तालुकाध्यक्ष सुशिलभाऊ मोरे, बौद्धाचार्य आर.एम.सूर्यवंशी, बाळकृष्णजी सोनोने,समाधान वानखेडे, संतोष इंगळे, विकास तायडे, जयपाल झंनके, विकास सुरवाडे, गौतम इंगळे, प्रेमानंद सोनवणे, संदीप सोनोणे,सुनिल इंगळे, महादेव सोनोने,प्रभाकर सोनोने, सापुर्डा सोनोने,अमोल सोनोने यांच्यासह शेकडो उपासक उपासिका उपस्थित होते

