भाजप शिंदे सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध
बुलढाणा - २९/०५/२३
महाराष्ट्र भवन दिल्ली येथे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या मूर्ती होत्या पण विनायक सावरकर जयंतीचा कार्यक्रम असल्याने महाराष्ट्राचे गद्दार मुख्यमंत्री यांना भाषण देण्यासाठी राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवून तिथे पोडीयम ठेवण्यात आला.हा गद्दार मुख्यमंत्री आमच्या अहिल्यादेवी होळकर पेक्षा मोठा आहे का? एवढी लायकी यांची नाही की ते आमच्या अहिल्यादेवी ची जागा घेईल.या जातीवादी सरकारला आमच्या अहिल्यादेवी च्या विचारांची एलर्जी आहे असे दिसून येते.
अहिल्यादेवी आणि सावित्रीमाई जिवंत असताना त्यांच्या कार्याला आणि विचारला विरोध करणारे लोक त्यांच्या मूर्ती स्वतःच्या कार्यक्रमात कश्या ठेवतील. समाजाचे गुलाम नेते विकास महात्मे, शिंदे, पडळकर कुठे गेले आता.आहे का हिम्मत यांच्यात मुख्यमंत्र्यांचा निषेध करून त्यांना जाब विचारण्याचा.हे आता काहीच करणार नाही ते मूग गिळून गप्प बसून आहे आता. मुख्यमंत्री यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा समाज तुम्हाला माफ करणार नाही.31 मे ला होणाऱ्या राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या चौंडी येथील कार्यक्रमात या मनुवादी मुख्यमंत्र्याला बोलवू नये.
निषेध असल्या नीच मानसिकतेचा आणि विचारांचा
अतुल भाऊ भुसारी पाटील जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्ष
