मुंबई येथील हिना मेश्रामच्या व नांदेड येथील अक्षय भालेराव हत्याकांडाचा निषेध.
राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळेच महाराष्ट्रात जातिय हल्ले होण्याचा आरोप करीत वंचित बहुजन आघाडीचे मलकापूर मध्ये तीव्र आंदोलन.
मलकापूर - दि. 09/06/23
नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील वंचित बहुजन आघाडीचा ग्राम शाखा महासचिव असलेला भीमसैनिक अक्षय भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून जातीयवाद्यांनी तो राग मनात ठेवून अक्षय भालेरावची निर्घुन हत्या केली सदर घटना मानवतेला कलंकित करणारी आहे हे हत्याकांड करणाऱ्या विकृत बुद्धीच्या जातीवादी आरोपींना फाशीची शिक्षा त्वरित करावी या व इतर मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले
सदर आंदोलन प्रसंगी बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे व जि.संघटक भाऊराव उमाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तथा वंचितचे तालुकाध्यक्ष सुशील मोरे, भा.बौद्ध म.तालुकाध्यक्ष राजु शेगोकार यांचे नेतृत्वात महाराष्ट्रात घडलेल्या जातीयवादी घटनाचा तीव्र संताप व्यक्त करीत प्रचंड घोषणाबाजी करुन निषेध करण्यात आला व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मलकापूर उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देन्यात आले
राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात जातीवाद मोठ्या प्रमाणात डोक वर काढत आहे, जातीय विषवल्ली पेरण्याचं काम येथे होत असून याला शिंदे फडणवीस सरकार खतपाणी घालत आहे आणि या जातीयवादी मानसिकतेतुनच बौद्ध मागासवर्गीयांचे खून केल्या जात आहेत त्यामुळे जातीयवादाविरुद्ध उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अशा हत्याकांड करणाऱ्या, जातीयवादी बांडगुळांच्या औलादीना तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा करावी व पिडीताना न्याय द्यावा असे प्रतिपादन अतिशभाई खराटे यांनी आंदोलनप्रसंगी केले
तसेच हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथे बौद्धांच एकही घर नसताना त्या गावांमध्ये मातंग समाज बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली,हा राग मनात ठेवून सनातनी लोकांनी मातंग समाजाच्या वस्तीवर प्राणघातक हल्ला केला,तसेच अकोल्याहून मुंबईला शिकायला आलेली हिना मेश्राम या बौद्ध तरुणीवर बलात्कार करून तिची क्रूर हत्या करण्यात आली आहे, मानवतेला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राला हालवून टाकणार्या घटनेची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
या आंदोलनात ता.उपाध्यक्ष विलास तायडे, नारायणराव जाधव, गजानन झणके, यासिन कुरेशी,शाताराम सोनोणे, ता.सचिव गणेश सावळे, महिला नेत्या दिपमाला इंगळे, ता.विधी सल्लागार एड. सुबोध इंगळे, युवा महासचिव अजय इंगळे,अनिल तायडे, एम.ओ.सरकते, कडूजी धुरंदर, दगडू राणे,विश्वास राने,अमोल भगत,धम्मपाल बोलके,मिलिद वाघ,सागर मोरे,सिद्धार्थ सावळे, सागर सावळे,आनंदा वाकोडे, जाफर खान, गंगाधर तायडे, शिवसिंग हडदे, देवेंद्र इंगळे, विलास इंगळे, रवींद्र इंगळे आदी उपस्थित होते.

