वंचित बहुजन आघाडी तालुका व भारतीय बौद्ध महासभा तालुका शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय तहसीलदार शेगाव यांना निवेदन सादर. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Saturday, 10 June 2023

वंचित बहुजन आघाडी तालुका व भारतीय बौद्ध महासभा तालुका शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय तहसीलदार शेगाव यांना निवेदन सादर.



 वंचित बहुजन आघाडी तालुका व भारतीय बौद्ध महासभा तालुका शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय तहसीलदार शेगाव यांना निवेदन सादर.


शेगाव - दि. 09/06/23

वंचित बहुजन आघाडी तालुका व भारतीय बौद्ध महासभा तालुका शेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय तहसीलदार शेगाव यांना निवेदन सादर करण्यात आले  , नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अक्षय भालेराव यांनी परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून बोंडार, जिल्हा नांदेड या गावातील प्रस्थापित लोकांनी 01/06/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अक्षय भालेराव यांची निर्गुण हत्या केली तसेच हदगाव तालुक्यातील वाळकी खुर्द येथे बौद्धांचा एकही घर नसताना त्या गावांमध्ये मातंग समाज बांधवांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली, मनात ठेवून सनातनी लोकांनी मातंग समाजाच्या वस्तीवर प्राणघातक हल्ला केला ,तसेच मानवतेला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राला हालवून टाकणारी घटना  अकोल्याहून मुंबईला शिकायला आलेली हिना मेश्राम या बौद्ध तरुणीवर बलात्कार करून तिची क्रूर  हत्या करण्यात आली आहे, वरील घडलेल्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडी तालुका शेगाव व भारतीय बौद्ध महासभा तालुका शेगाव यांच्या वतीने जाहीर निषेध करतो व अक्षय भालेराव यांच्या मारेकऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा देण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले असून या निवेदनावर एकूण 65 लोकांच्या स्वाक्षऱ्या आहेत व खालील निवेदन देण्यासाठी आजी-माजी पदाधिकारी यांनी आपला निषेध नोंदविला,

 यामध्ये के एम हेलोडे ,एच डी अजने,दादाराव अंभोरे, गौतम इंगळे ,(चिंचोली) गजानन ससाने ,चंद्रमणी भोजने, तुकाराम इंगळे, संगपाल शिरसाट, के के शेगोकार, कुसुम इंगळे, शेवंता इंगळे, शंकर इंगळे, सुरेश भाऊ गवांदे, विठ्ठलराव पाटील ,संतोष भाऊ भेंडे, बाबन भाऊ वाकोडे, राजेश पहूरकर, सुगत सावदेकर, संतोष पहुरकर (तिव्हांन खुर्द)प्रभाकर पहुरकर, धीरज सावदेकर, गौतम गवई, डीगंबर निंबाळकर, शिवशंकर फुलकर, तेजराव भोजने, अमोल भोजने, भास्कर शिरसाट ,कपिल शिरसाट ,अनिल भाऊ वाकोडे, कैलास दाभाडे, विनोद सरदार, डी एन खंडारे, मधुकरराव बाबुळकर, ईश्वर दाभाडे ,ईश्वर भाऊ इंगळे, गौतम इंगळे उपसरपंच, दीपक विरघट ,राजाभाऊ भोजने जि प सदस्य, सुखदेवराव सोनोने, चंद्रभान कळंबे, उदयनराजे सुरवाडे, मोहनराव पाटील, प्रकाश गवई,मुकुंदराव सुलताने सरपंच ,इत्यादी कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी उपस्थित होते.