नांदेड जिल्ह्यातील बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव खून प्रकरणाचे बुलढाणा जिल्ह्यात तिव्र पडसाद.
जिल्हयातील सर्व आंबेडकरी संघटनांनी एकञ येवून काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड आक्रोश मोर्चा.
मेहकर - दि. 12/06/23
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती का काढली यांचा राग मनात ठेवून अक्षय भालेराव या दलीत तरूनांचा गावातील काही जातंध व धर्मांध माथे फिरूनी निर्घून खून केला. या घटनेचे पडसाद अख्या महाराष्ट्रात ऊमटले. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात आंदोलनाचा भडका उडाला.
बूलढाणा जिल्हात देखील वेगवेगळ्या आंबेडकरी संघटना एकञीत आल्या. मोर्चात विधान सभेचे आमदार मा.धिरजभाऊ लिंगाडे,समाजभूषण माजी सभापती मा.दिलीपभाऊ जाधव महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस चे संजयभाऊ राठोड, जयश्रीताई शेळके, आंबेडकरी चळवळीतले भीमशक्तीचे नेते भाई कैलास सूखधाने, पॅथ्थर नेते भाई सोमचंद्रभाई दाभाडे, रिपब्लीकन सेनेचे यूवा प्रदेशाध्यक्ष भाई दिलीप खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे साहेबरावजी सरदार, भूमी मूक्ती मोर्चाचे भाई प्रदिप अंभोरे, भाई अशिषबाबा खरात, भीमशक्तीचे प्रतिक भैय्या जाधव, काॅग्रेसचे दत्ताभाऊ काकस, यूवा नेते शैलेश खेडेकर,समतेचे निळे वादळ संघटनेचे अरूनभाऊ डोंगरे,भाई विजयकांत गवई,रिपाईचे प्रा.सुनिल ईंगळे, भीमशक्तीचे आकाशभाई कासारे,तथागत ग्रूप संघटनेचे मा.संदिप गवई,संतोष मेढे,प्रकाश सुखधाने यांचे सह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
काॅग्रेस पक्षाने देखील मोर्चास पाठींबा दर्शवून सहभाग घेतला.
बूलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा पोहचला.
अक्षय भालेराव प्रकरणासह बूलढाणा जिल्ह्यातील अन्याय अत्याचाराचा पाढाच मोर्चाचे शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यापूढे वाचून दाखवला. व दलितांवरिल अन्याय अत्याचाराचा त्वरीत प्रतीबंध करा असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. जिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांसोबत लवकरच बैठक घेवून देऊळगावराजा तालूक्यात झालेल्या अन्याया संदर्भात योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले.
या आक्रोश मोर्चात नेते, कार्यकर्ते, हजारो महिला ,पूरूष, भीमसैनिक व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


