राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्हा कार्यकर्त्यांची आढावा बैठक देऊळगावराजा येथे झाली संपन्न.
देऊळगावराजा प्रतिनिधी -
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील ता. देऊळगाव राजा जि. बुलढाणा येथे संपन्न झाली
मा. राष्ट्र नायक महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका विषयी सखोल चर्चा झाली बुध बांधणी राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्य हे तळागाळापर्यंत पोहोचले आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या कार्याचा आढावा दिला आढावा देत मागील केलेली कामे व पुढे काय करता येईल व काय नियोजन आहे हे सांगितले तसेच पक्षाने एक चांगल्या प्रकारची उंची निर्माण केलेली आहे त्यामुळे सर्वांचं योगदान महत्त्वाचा आहे या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर विदर्भ उपाध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे मा.डॉ. तौफिक शेख साहेब उपस्थित होते जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा मा. अतुलभाऊ भुसारी पाटील जिल्हाध्यक्ष बुलढाणा रासप मा अमोल भाऊ काकड युवा महिला जिल्हाध्यक्ष किरण ताई वाघ मा रासप नेते कारभारी गायकवाड युवा नेते दिपक म्हस्के सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष रासप सतोष वनवे इतर सर्व पदाधिकारी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा अमोल भाऊ काकड सर यांनी केले व आभार प्रदर्शन मा अतुल भाऊ भुसारी पाटील यांनी केले.
