सिंदखेडराजा तालुक्यातील कृषी केंद्र चालकांनी शेतकऱ्यांची लुट थांबवावी
सिंदखेडराजा/ प्रतिनिधी, दि.20/06/23
सिंदखेडराजा तालुक्यांत बी.बियाणे आणि रासायनिक खतांची लिकीग थांबवून कृषी केंद्र चालकांची दुकाने.गोदामाची तपासणी करून मुबलक बियाणे उपलब्द करून देणे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भाऊ भुसारी यांनी तहसिलदार यांच्याकडे केली आहे तालुका कृषी क्षेत्राचा खुप मोठी बाजारपेठ असुन या मध्ये विक्री करणारे कृषी केंद्रीची संख्या खुप जास्त आहे शेतकरी हित साध्य झालं पाहिजे अशी अपेक्षा असते परंतु आपल्या शहरात तालुक्यांत शेतकऱ्यांची लूट होताना दिसत आहे कापूस बॅगाची शासकीय किमान ८५३असुन काही विशिष्ट बॅगाची वेगवेगळ्या पद्धतीन मार्केटिंग करून व कृञिम पध्दतीन टंचाई निर्माण करुन चढ्या दराने म्हणजेच १२००रु.ते१५००रुपायाना खतांच्या बाबतीत शेतकऱ्यांने ज्या खतांची मागणी केली त्या खतासोबत दुसरी म्हणजे दोन बगावरती एक बॅग बळजबरीने दिले जाते शेतकऱ्यांला नको असते परंतु जर शेतकऱ्यांने घेण्यास नकार दिला तर आमच्या कडे कोणत्याही खंत शिल्लक नसल्याबाबत दुकानदारांकडून सांगितल जात सोबत खतांची कृत्रिम टंचाई भासविण्यात येत असुन कृषी केंद्र चालकांनी शहरांसह तालुक्यातील काही खेड्यात शासनाला माहित नसलेले गोदाम घेऊन त्यात मोठ्या प्रमाणात खतांच्या साठा करून ठेवला आहे याची कल्पना शासनाला आहे का
शासनाला अंधारात ठेवून इतर गोदामांमध्ये खुप मोठा खतांचा साठा शिल्लक असल्याबाबत राष्ट्रीय समाज पक्ष पदाधिकारी ना कळते पण शासनाला का कळत नसावे आणि या संदर्भात कृञिम टंचाई निर्माण करुन चढ्या दराने खतांची लिंकिंग करून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्याचें कटकारस्थान कृषी केंद्र संचालक करताना दिसत आहेत राष्ट्रीय समाज पक्ष आपल्याकडे तक्रार अर्ज करेल आणि मग आपण चौकशी कराल असे न करता सरसकट सर्व दुकाने त्याची माहिती असलेली गोदाम नसलेली गोदाम ची तपासणी करून कारवाई करावी व आम्हा शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा राष्ट्रीय समाज पक्षाचा चा व शेतकऱ्यांच्या उद्रेक झाल्यास होणा-या परिणामांला शासना प्रशासनच जबाबदार राहील याची विशेष करून नोंद घ्यावी आताचं बियाणे खते खरेदी करण्याची वेळ असुन आपण आज पासून कारवाई करावी न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष आंदोलन करेल

