तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांचे संभाजी नगर मध्ये जंगी स्वागत
संभाजीनगर प्रतिनिधी - 20/06/23
संभाजीनगर - मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई हे संवाद दौर्यानिमीत्त संभाजीनगर शहरात आले असता,त्यांचे तथागत ग्रुप संभाजी नगरच्या पदाधिकारी व सदस्यांनच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
तथागत ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव मा.देवकांत दादा मेश्राम,मराठवाडा विभाग अध्यक्ष मा.संतोष भाऊ खरात,औरंगाबाद शहराध्यक्ष या.अंकुश दादा हिवाळे यांनी मंगळवार दिनांक 20 जून रोजी सकाळी संभाजीनगर शहरात मा.संदिपभाऊ गवई यांच्या सोबत सविस्तर चर्चा करून संघटनेच्या संभाजीनगर जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचा व महिला आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनचा सक्षमीकरण व उद्योग उभारणी करण्यासाठी सर्वत्र विभागामध्ये मेळावे घेण्याचे ठरले आहे व संभाजीनगर येथील औरंगजेब यांच्या कबरला भेट देण्यात आली.
त्यावेळी संभाजीनगर जिल्ह्याच्या तसेच शहराच्या वतीने शाल,पुष्पगुच्छ, देऊन संदिपभाऊ गवई यांचे स्वागत करण्यात आले.
