तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई यांचे अहमदनगरमध्ये जंगी स्वागत
अहमदनगर शहर - मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई हे संवाद दौर्यानिमीत्त अहमदनगर शहरात आले असता,त्यांचे तथागत ग्रुप अहमदनगर शाखेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.
तथागत ग्रुपचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख रोहित गांधी, प्रबोधिनी न्युजचे जिल्हा प्रतिनिधी देवदत्त साळवे व शहर प्रतिनिधी संगिता खिलारी यांनी बुधवार दिनांक २१जून रोजी सकाळी शहरातील माळीवाडा येथे संदिपभाऊ गवई साहेब यांचे सोबत सविस्तर चर्चा करून संघटनेच्या अहमदनगर जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचा विभागवार मेळावा घेण्याचे ठरले.
त्यावेळी अहमदनगर जिल्ह्याच्या तसेच शहराच्या वतीने शाल,पंचा व पुष्पगुच्छ देऊन संदिपभाऊ गवई यांचे जंगी स्वागत करण्यात आले.


