तथागत ग्रुपच्या प्रत्येक पदाधिकारी यांच्या सत्काराच्या हारातील एकही पाकळी व्यर्थ जाऊ देणार नाही : संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई
सातारा - मेहकर - लोणार विधानसभा मतदारसंघाचे सर्वाचे लाडके युवकांच्या मनातील भावी आमदार तसेच तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई हे संवाद दौर्यानिमीत्त सातारा शहरात आले असता,त्यांचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा सिमा ताई गायकवाड गरुडा ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.आदित्य गायकवाड व समस्त पदाधिकारी व महिला आघाडी सदस्यांनच्या वतीने भव्य जंगी स्वागत करण्यात आले.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा सिमा ताई गायकवाड,गरुडा ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.आदित्य गायकवाड व समस्त पदाधिकारी यांनी गुरुवार दिनांक 22 जून रोजी दुपारी सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथे आदरणीय.संदिपभाऊ गवई साहेब यांचे स्वागत केले असता व सर्वानी बैठक घेऊन संघटनेचे ध्येय उदिष्टे जनसामान्य माणसापर्यंत पोचवणे व महिलांनासाठी सबळिकरण करण्यासाठी सर्वान सोबत सविस्तर चर्चा करून संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला, तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांचा विविध क्षेत्रातील मेळावे घेण्याचे ठरले.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा सिमा ताई गायकवाड गरुडा ग्रुपचे अध्यक्ष मा.पै.आदित्य गायकवाड यांनी सांगितले लवकरच महिला सक्षमीकरण व संघटना वाढिचे कार्य मोठ्या जोमाने सातारा जिल्ह्यात सुरू करण्यात येईल..


