तथागत ग्रुप अकोला जिल्ह्याच्यावतीने उल्लेखनीय कामगिरी
अकोला - तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.संदीप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार बार्शिटाकळी ता.जि.अकोला रा.पाटखेड येथील एका गरीब कुटुंबातील सुनिता विठोबा पवार यांचे पती वारले त्या आपले व आपल्या मुलांचे पोट हातावर जगत असताना त्यांना मुलांचा सांभाळ करत शिक्षण हि त्याच्या मुलांना शिकवावे लागत आहे यावेळी आठव्या वर्गासाठी पुस्तके घेण्यासाठी आर्थिक अडचण आली या विधवा स्त्री ला त्यांची मुले शालेय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून तथागत ग्रुपच्या अकोला जिल्हा अध्यक्ष मा.सुनिलभाऊ वनारे यांच्याकडे आल्या असता त्यांना तातडीने शालेय साहित्य पुस्तक,वह्यांचे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुनिल वनारे यांच्या हस्ते अकोला येथे तातडीची मदत देऊन व आर्थिक सहाय्य करण्यात आले.
यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे अकोला जिल्हा अध्यक्ष मा.श्री.सुनिल वनारे, अकीलभाई आदि उपस्थित होते..
