महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेरील राज्यात तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, उत्तर प्रदेश,छत्तीसगढ़ या राज्यामधे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटना खूप मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे संघटनेत विविध पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारणीमधील पदाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिपभाऊ गवई यांनी सदर समितीची घोषणा करताना सांगितले की यापुढे महाराष्ट्रातील नवनियुक्त पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेपर्यंत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेची ध्येय धोरणे तसेच महाराष्ट्रा मधील जनहिताची केलेल्या कामांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवितील, तसेच राज्याच्या प्रत्येक गावात, तालुक्यात आणि जिल्ह्यात लोकांच्या समश्या सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करतील, अन्याय अत्याचाराच्या विरोधात,भ्रष्टाचाराविरोधात असो बेरोजगारीचे प्रश्न असो या करिता तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी काम करतील असे ही संस्थापक अध्यक्ष मा. संदिपभाऊ गवई यांनी सांगितले.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या नियुक्तीत महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष गजानन सरकटे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अंकुशभाऊ राठोड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अख्तरभाई कुरेशी, महाराष्ट्र राज्य संघटक कुणाल माने, महाराष्ट्र राज्य सचिव राधेशाम खरात, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रशांत रामटेके, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सुनिल वनारे, महाराष्ट्र राज्य महासचिव सुरेशदादा चांदणे, महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख अंकुश हिवाळे, महाराष्ट्र राज्य प्रवक्ते कांता राठोड, महाराष्ट्र राज्य सदस्य विपुल आढाव सर तसेच महिला आघाडी कार्यकारी अध्यक्ष निता बनसोडे, महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्षा निशा सोनवणे, महाराष्ट्र राज्य युवती आघाडी अध्यक्षा कोमल शिखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेला आणखी मजबूत बनवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यापासून तर जिल्हा,तालुका,शहरा पर्यंत आणखी मोठ्या प्रमाणात नियुक्त्या दिल्या जातील असे संस्थापक अध्यक्ष मा. संदिपभाऊ गवई यांनी सांगितले आहे.

