दानात दान भोजनदान सर्व श्रेष्ठदान
श्याम वाकदकर
सुरडकर परिवाराचा स्तुत्य उपक्रम.
चिखली - आई च्या स्मृती दिनानिमित्त सुरडकर परिवाराच्या वतीने ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित विनाअनुदान तत्ववर सुरु असलेल्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रम भोकर येथील वृद्धाना भोजनदान देण्यात आले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम वाकदकर हे अध्यक्ष होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सुरडकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष वसंता डोंगरदिवे, संस्थेच्या अध्यक्ष लताबाई डोंगरदिवे, वंदना सुरडकर हे होते.
दानात दान भोजनदान हे सर्व श्रेष्ठ दान असून तेही निराधार वयो वृद्धाना एकवेळ च भोजन देऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे अश्याच प्रकारे वृद्धाश्रमास आर्थिक धान्य किंवा इतर वस्तू स्वरूपात मदत करण्यासाठी दानशूरांनी समोर आले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते श्याम वाकदकर यांनी व्यक्त केले. आई च्या स्मृती दिनानिमित्त वृद्धाश्रमात भोजदान देऊन सामाजिक दाईत्व निभावल्याचा अत्यानंद होतोय असे मत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सुरडकर यांनी व्यक्त केले.
यावेळी वृद्धाश्रमातील वृद्धाच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासारखा होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दुर्गाबाई साबळे, द्वारकाबाई घेवंदे, योगेश साबळे, धम्मापाल घेवंदे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन संचालक प्रशांत डोंगरदिवे तर आभार संचालिका रुपाली डोंगरदिवे यांनी केले.
