बेडग गावातील लोकांची तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी घेतली भेट.
इस्लामपूर मध्ये तथागत ग्रुपच्या वतिने सांगली जिल्हातील तालुका मिरज बेडग गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कमानिचे काम संपूर्ण बांधकाम बांधून पूर्ण होत झाले असता तेथील बुरसटलेल्या विचारसरणीच्या लोकांनी पोलीस बंदोबस्तात कमान पाडून टाकली हे सहन न झाल्यामुळे बेडग गावातील समस्त आंबेडकरी चळवळीतील माता भगिनी व लोकांनी आपल्या दोन दोन महिन्याच्या तानुल्या बाळा सह आपल्या घरादाराला कुलप घालून अस्मितेच्या लढ्यासाठी मुंबई पर्यंत लॉंग मार्च काढला आहे त्यांच्या डोळ्यातील अश्रूच सर्व काही सांगून जात आहेत हा लढा भावनेचा आहे लोकशाही विरोधी शक्तीचा बिमोड करण्यासाठी आहे या लॉंग मार्चला यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीप भाऊ गवई, सांगली जिल्हा अध्यक्ष वैभव भाऊ काळे, अनिकेत पवार,करण कांबळे भेट घेतली व या सदर घटनेचा पाठिंबा देत जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
