तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिल्हा बुलढाणा येथील चिखली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेधार्थ निवेदन. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 31 July 2023

तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिल्हा बुलढाणा येथील चिखली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेधार्थ निवेदन.


 तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना जिल्हा बुलढाणा येथील चिखली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेधार्थ निवेदन.


 मणिपूर राज्यात काढलेली  महिलांची नग्न धिंड आणि बेडग येथे समाजकंटकांनी उध्वस्त केलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची कमान या अमानवी घटनेच्या निषेधाबाबत तथागत ग्रुप  बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्याच्या वतीने तहसिल येथे तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.



   मणिपूर राज्यातील कांगपोकपी जिल्ह्यात जातीयवादी मानसिकतेच्या जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अमानवी अत्याचार केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली.याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने नोंद न घेता उलट संबंधित आरोपींना पाठीशी घालत दडपशाहीने लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला आहे.

    दुसऱ्या बाजूला पुरोगामी महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बेडग येथे 16 जून रोजी याच गावातील समाजकंटकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारलेली स्वागत कमान उध्वस्त करून महामानवांची विटंबना केली आहे.या दोन्हीही अत्यन्त निंदनीय घटनेचा तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या  वतीने जाहीर निषेध करीत आहोत.संबंधित दोषींवर कठोर कारवाई करून या घटनेतील संबंधित आरोपींना पाठीशी घालणाऱ्या मणिपूरचे राज्यसरकार तात्काळ बरखास्त करावे अशी आग्रही मागणी करीत आहोत.या तीव्र लोकभावनेची दखल घेऊन आपण आमची ही लोकभावना वरिष्ठ पातळीवर कळवावी ही विनंती .

मणिपूर हिंसाचारात महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर पाशवी बलात्कार करून हत्या करणार्या नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तथागत ग्रुप  बुलढाणा येथील चिखली तालुक्याच्या वतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

हे निवेदन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदिप भाऊ गवई यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले.

यावेळी तथागत ग्रुप महाराष्ट्र प्रदेश सचिव राधेशाम खरात, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष सौ.अश्विनी वेलदोडे,महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख जाकेरा बी शेख,आदी समस्त पदाधिकारी कार्यकर्ते व महीला आघाडी उपस्थित होते.