अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करा रिपब्लिकन सेनेची मागणी. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 24 July 2023

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करा रिपब्लिकन सेनेची मागणी.


अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ सुरू करा रिपब्लिकन सेनेची मागणी.

  चिखली प्रतिनिधि :— अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पहिली ते आठवी करिता सुरू होती परंतु केंद्र सरकारने मागील वर्ष 2022 ते 23 ही बंद केले अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती सरकारने तात्काळ सुरू करावी असे निवेदन शिक्षणाधिकारी यांना रिपब्लिकन सेनेच्या वतीने दिनांक 24 जुलै  2023 रोजी देण्यात आले. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती घेण्यासाठी पालकांनी अधिक परिश्रम घेऊन राष्ट्रियकृत बँकेत खाती काढले उत्पन्नाचे दाखले प्रत्येक वर्षी काढले यासाठी पालकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे प्रत्येक वर्षी पालकांनी अर्ज ऑनलाईन भरले त्यामध्ये काही जणांची शिष्यवृत्ती मंजूर झाली आणि काही जणांची शिष्यवृत्ती मंजूर झाली नाही इयत्ता पहिली ते आठवी शिक्षण घेणाऱ्या देशातील मुस्लिम, शेख, पारसी, ख्रिश्चन, जैन आणि बौद्ध या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना केंद्राकडून देण्यात येणारे शिष्यवृत्ती अचानक बंद करण्यात आले केंद्र सरकारने विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे मोदी सरकार हे गोरगरिबांना अच्छे दिन शिष्यवृत्ती बंद करून दाखवत आहे अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ही बंद केली ती तात्काळ सुरू करण्यात यावी व शिष्यवृत्ती मध्ये वाढ करावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजयकांत गवई यांनी निवेदनामध्ये दिला आहे निवेदन देतेवेळी  रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्माभाऊ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई, तालुकाध्यक्ष श्याम लहाने, तालुका उपाध्यक्ष सोहेल सौदागर, शहर अध्यक्ष सुनील सोळंके, शहर उपाध्यक्ष रमेश आंभोरे, शहर उपाध्यक्ष सतीश पवार, तालुका सदस्य अरुण जाधव, शहर सदस्य दीपक तायडे, सौरभ बावस्कर शाखा अध्यक्ष, उपसरपंच बो.वसु हरसिंग छर्रे इत्यादी उपस्थित होते.