साळवे परिवाराकडून वृद्धाश्रमात कपडे वाटप
संस्थेच्या वतीने विधवा, घटस्फोटीत महिलांना साडी वाटप
चिखली प्रतिनिधि:-
ऋणानुबंध समाज विकास संस्थे च्या अध्यक्ष सौं लताबाई डोंगरदिवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौं वर्षा बाबासाहेब साळवे यांनी तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाना कपडे तर संस्थेच्या वतीने विधवा घटस्फोटीत परीतकत्ता महिलांना साड्या वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रम चे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य योगेश कऱ्हाडे तर प्रमुख मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते राम ढाके तर प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य सौं शिल्पाताई डोंगरदिवे, सौं आशाताई डोंगरदिवे हे होते.
आई च्या वाढदिवसाच्या निमित्त संस्थेच्या वतीने विधवा घटस्फोटीत परीतकत्ता महिलांना साड्या वाटपाचे कार्य कौतुकस्पद संस्थेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात त्यांतूनच आई च्या वाढदिवसाच्या निमित्त विधवा महिलांचा सन्मान करणे हे कौतुकस्पद कार्य आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते राम ढाके यांनी व्यक्त केले.आई च्या वाढदिवसानिमित्त सौं वर्षा बाबासाहेब साळवे यांनी वृद्धाश्रमातील वृद्धाना कपडे भेट दिल्याने वृद्धा च्या चेहऱ्यावर वेगळ्या प्रकारचा आनंद दिसला त्यांच्या व संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे, तर आभार प्रदर्शन सौं रुपाली डोंगरदिवे यांनी केले. सौं वर्षा बाबासाहेब साळवे, कु. वैरंजा साळवे, कु विनया साळवे, प्रियांका वानखेडे, सुमन राजू डोंगरदिवे, लक्ष्मी अरुण डोंगरदिवे, द्वारका घेवंदे, हिरा बाई मुख्यदल, संगीता वानखेडे, सिंधूबाई बोर्डे, दुर्गाबाई साबळे, शशिकला साबळे, कावेरी डोंगरदिवे, संध्या काळे, बेबीबाई डोंगरदिवे, गुंफाबाई घेवंदे, लताबाई वानखेडे, पूजाबाई डोंगरदिवे, ज्योती डोंगरदिवे, गीता वानखेडे, नामदेव डोंगरदिवे, उत्तम महाराज डोंगरदिवे, बालू डोंगरदिवे यांच्यासह वृद्धाश्रमातील वृद्ध व इतर उपस्थित होते.
